करंजी येथे गावठी कट्ट्यासह एक ताब्यात | पुढारी

करंजी येथे गावठी कट्ट्यासह एक ताब्यात

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील करंजी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने गावठी कट्ट्यासह एक जणाला ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल विनोद शिवाजी मासाळकर यांच्या फिर्यादीवरून शेरखान मुबारक पठाण (रा, करंजी) याच्या विरोधात पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शेरखान मुबारक पठाण हा करंजी गावात बस स्टॅन्ड जवळ एक देशी कट्टा (अग्निशस्त्र) विनापरवाना बेकायदा बाळगून तो त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत आहे.

त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक डि.एस. मुंडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिगडे, बाप्पुसाहेब फोलाने, भिमराज खरसे, संभाजी कोतकर, विनोद मासाळकर या पोलिस पथकाने पठाण त्याच्यावर सकाळी साडे दहा वाजता छापा घालून त्यास जागीच पकडुन पठाण याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेस एक सिंगल बोर देशी कट्टा व पॅन्टच्या खिशामध्ये पिवळ्या धातुचा जिवंत राऊंड मिळुन आली. करंजी बस स्थानकाजवळ पाथर्डी रोडला हॉटेल समाधन जवळ शेरखान मुबारक पठाण हा विनापरवाना बेकायदा शिंगल बोर देशी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगतांना मिळुन आला म्हणुन पठाण याच्या विरुध्द आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Back to top button