नगर: महापालिकेत सत्ताधाऱ्यांना घराचा आहेर, सावेडी स्मशानभूमी भूसंपादनाला राष्ट्रवादीसह अन्य नगरसेवकांचा विरोध | पुढारी

नगर: महापालिकेत सत्ताधाऱ्यांना घराचा आहेर, सावेडी स्मशानभूमी भूसंपादनाला राष्ट्रवादीसह अन्य नगरसेवकांचा विरोध

नगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सावेडी गावासाठी ३२ कोटी रुपये खर्च दोन हेक्टर जागा भूसंपादित करण्याचा ठराव झाला. विषय चार होता, स्थान आता सत्ताधारी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नगरसेवकांनी विरोधी दर्शविला असून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा नुकतीच घेण्यात

आलीसाठी भूमी असारी याबाबत नगरसेवकांसह सामाजिक कार्यकत्यांनी पाठपुरावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर एका पदाधिकाने स्वतःची दोन हेक्टर जागा स्मशानभूमीसाठी देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार हेक्टर जागा घेण्याचा सर्वसाधारण सभेत झाला.

त्यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, मदन आढाव यांनी त्यास तीव्र विरोध केला. तर, सभागृहात नगरसेवकांची संख्या कमीच होत्या. त्यात भूर्मपादनाच्या मंजुरी देण्यात आली. महापालिकेत शिवसेना राष्ट्रवादीची एकत्रित सत्ता असतानाही आज नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेच्या केला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका परवीन कुरेशी यांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले भागात स्मशानभूमी उपसा महासभेत संपादनाचा विषय मंजूर करण्यात आला. त्याला माझा लेखी विरोध आहे. कारण त्या ठिकाणी क्र. ५८.५९ क्रमांकाचे आरक्षणानभूमीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आरक्षित करण्यात आलेले आहे. ती जागा ताब्यात घेऊन स्मशानभूमी करण्यात यावी.

नगररचना विभागाकडून चुकीची व महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होईल अशी कार्यपद्धती सुरू आहे. त्यांच्याकडून प्रशासन व नगरसेवकांची दिशाभूल केली जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नगरसेवक समद खान यांनीही त्या ठरावाला विरोध दर्शविला आहे. स्मशानभूमीसाठी आरक्षित जागा असूनही नवीन जागा खरेदी करण्यासाठी नगररचना विभाग व पदाधिकाऱ्यांचा हालचाली आहेत. निवेदनात म्हटले आहे. त्यास आमचा लेखी विरोध आहे. दरम्यान, बहुजन समाज पक्षाचे नगरसेवक अक्षय उनवणे यांनीही त्या ठरावास लेखी विरोध दर्शविला

मुख्यमंत्र्यांना निवेदन

सावेडी स्मशानभूमीसाठी घेण्यात आलेल्या ठरावाच्या विरोधात महापालिकेतील शिंदे गटाचे नगर- सेवक संग्राम शेळके व बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाध्यक्ष बाबूशेट टायरवाले यांनीही विरोध दर्शविला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस महार यांना निवेदन दिले आहे.

५० लाखाची जागा ३२ कोटीला दाखविली

नगररचना विभागाने आरक्षित जागा ताब्यात न घेता नवीन जागेचे भूसंपादन करण्याचे ठरविले. ती जागा नदीच्या कडेला असून, त्याची आजरोजीची किमत ४०-५० लाख रुपये आहे. नगररचना विभागाने जागेची किंमत ३२ कोटी रुपये दाखविली आहे. ती जागा ३२ कोटी रुपयास मनपाने विकत घ्यावी, असा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये नगररचनाकार व काही पदाधिकारी महापालिकेचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याच्या तयारीत आहेत, असे कुरेशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

Back to top button