नगर : गुलमोहर रस्ता होणार मॉडेल : आ. संग्राम जगताप | पुढारी

नगर : गुलमोहर रस्ता होणार मॉडेल : आ. संग्राम जगताप

नगर : पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्ता सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे. त्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. दहा मीटर रुंद रस्त्याकडेला साईटपट्टी व मधोमध स्ट्रीट लाईट बसविण्यात येणार आहे. त्यामुळे गुलमोहर रस्ता हा मॉडेल रस्ता म्हणून ओळखला जाईल. नगर शहरातील नागरिकांनी विकास कामांमध्ये सहभाग नोंदवावा, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

गुलमोहर रस्त्याच्या विकास कामाची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, माजी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेवक प्रकाश भागानगरे, उद्योजक अमोल गाडे, सुमित कुलकर्णी, शिरीष जानवे, सुरेश म्हस्के, गिरीश जगताप, जितेंद्र खंडेलवाल, अ‍ॅड. मंगेश सोले, संदीप भापकर, प्रवीण पालवे, हर्षल बांगर, गोकुळ गोधडे, अ‍ॅड. विक्रम वाडेकर, केतन क्षीरसागर, शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखी उपस्थित होते.

आमदारांनी निधी दिला : बोरकर
माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर म्हणाले, गुलमोहर रस्ता हा उपनगरातील एक महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. रस्त्याची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली होती. आमदार संग्राम जगताप यांनी या रस्त्यासाठी मोठा निधी प्राप्त करून दिला आहे. या रस्त्याचे काम आता प्रगतिपथावर असून लवकरच हे काम मार्गी लागणार आहे.

Back to top button