आश्वी खुर्द येथे मृत बिबट्या आढळला | पुढारी

आश्वी खुर्द येथे मृत बिबट्या आढळला

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे मृत अवस्थतेत बिबट्या आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विषारी साप चावल्यामुळे अथवा विषबाधेमुळे किंवा अन्न न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. माहिती मिळताच वनविभागाने तातडीने या मृत बिबट्याचा मृतदेह हालविल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
आश्वीसह पंचक्रोशीत बिबट्यांचा मोठा वावर असल्यामुळे नियमित पशुधनासह माणसावर हल्ल्याच्या घटना घडत असतात. नुकतीच ऊस तोड मजुंराच्या चिमुकल्या मुलांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. सुदैवाने या हल्ल्यात चिमुकल्यांचे प्राण वाचले असले तरी परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.

बुधवार सकाळी याच परिसरात काही अंतरावरावर प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या कोकजे वस्ती येथे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा सेलचे जिल्हा सचिव प्रशांत कोडोलीकर यांच्या विहिरी जवळील शेतामध्ये पुर्ण वाढ झालेला मृत बिबट्या स्थानिक नागरीकांना बुधवारी आढळून आला.

याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन या मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान या बिबट्याचा मृत्यू कसा झाला? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी विषारी साप चावल्यामुळे अथवा विषबाधेमुळे किंवा अन्न न मिळाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येण्यात येत आहे. तर मृत बिबट्या हा दोन वर्ष वयाचा मादी बिबट्या असल्याची माहिती मिळाली आहे. यापुर्वीही या परिसरात बिबट्या मृत झाल्याचे घटना घडल्या आहेत.

Back to top button