घोडेगाव : पाणी योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न ; सुनील गडाख यांची विरोधकांवर टीका | पुढारी

घोडेगाव : पाणी योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न ; सुनील गडाख यांची विरोधकांवर टीका

घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे माजी मंत्री आ.शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नांतून 48.83 कोटींची पाणी योजना मंजूर झालेली आहे. या योजनेच्या पाणी उद्भव व साठवण तलावासाठी आवश्यक असणारी दोन एकर जागा त्यांनी जलसंपदा विभागाकडून मिळविली आहे. मात्र, ज्यांना स्वत:च्या गावात गटारीचेही काम करता आले नाही, असे स्वयंघोषित पुढारी काहीही न करता या योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील गडाख यांनी केली. घोडेगाव येथील पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेऊन माजी मंत्री गडाख यांनी जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना मंजूर करून आणली. या योजनेची निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे.

या योजनेच्या कामाचे भूमिपूजन सुनील गडाख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, या योजनेद्वारे घोडेगावकरांना नियमित स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी मिळणार आहे. यामुळे घोडेगावकरांची तहान भागणार आहे. पाणी योजना लवकरात लवकर गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याबाबतही सुनील गडाख यांनी यावेळी सूचना केल्या.

येणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीत आ. शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व मिळून घोडेगाव ग्रामपंचायतीवर भगवा झेंडा फडकवू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते अशोकराव येळवंडे, बाळासाहेब सोनवणे, सचिन चोरडिया यांनी आ. गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेली पाणी योजना ही घोडेगावकरांसाठी विशेष आनंदाची बाब आहे. यातुन घोडेगावकरांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी मुळाचे व्हा.चेअरमन कडूबाळ कर्डिले, भाऊसाहेब मोटे, बाबुराव चौधरी, रंगनाथ जंगले, बबनराव दरंदले, बाळासाहेब बनकर, बाप्पूसाहेब शेटे, राजेंद्र बोरुडे, नानासाहेब रेपाळे, दगडू इखे, दिलीप लोखंडे, अरुण जाधव, राम सोनवणे ,वसंतराव सोनवणे,सुदामराव तागड,राजेंद्र सोनवणे, भावराव बर्‍हाटे, संतोष सोनवणे,सुहास गोंटे यांच्यासह घोडेगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button