शिर्डीच्या घरफोडीत 7 लाख लंपास | पुढारी

शिर्डीच्या घरफोडीत 7 लाख लंपास

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : शिर्डीतील एका बंगल्यात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शिर्डी पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  श्रीसाईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सुमित शेळके यांच्या बंगल्यात घुसून चोरट्यांनी 7 लाखांचे दागिने लंपास केले. याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात सदाशिव शेळके यांनी तक्रार दाखल केली.  तक्रारीत म्हटले आहे की, सदाशिव शेळके यांच्या कुटुंबातील सदस्यांसह पिंपळवाडी रोड येथे बंगल्यात राहतात.

शनिवारी (दि.14) ऑक्टोबरच्या मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास हे सर्वजण झोपेत होते. यावेळी चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करून 10 तोळे वजनाचा सोन्याचा हार, 5 तोळे वजनाच्या बांगड्या व हिरे जंडीत अंगठी आदी सुमारे साडेसात लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. या घटनेची खबर मिळताच पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील व अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन बंगल्याची पाहणी केली. दरम्यान, चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील करीत आहे.

बंदुकीचा धाक..!
चोरट्यांच्या हालचालीचा अंदाज येताच जागे झालेल्या शेळके यांच्यासह घरच्यांना चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दगड फेकून जखमी केले. जाता- जाता चारचाकी पळवून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी सुरू न झाल्याने चोरट्यांनी पळ काढला.

 

Back to top button