राहुरी : घरात घुसून विवाहितेचा विनयभंग करून धमकी | पुढारी

राहुरी : घरात घुसून विवाहितेचा विनयभंग करून धमकी

राहुरी, पुढारी वृत्तसेवा: राहुरी तालुक्यातील 30 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून, लाथा-बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडित विवाहित तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अभिषेक तुकाराम नालकर व काही तरुण मुले मोठ-मोठ्याने आरडाओरड करीत असल्याने मी त्यांना, ‘आरडा-ओरड करू नका,’ असे म्हणाल्याने अभिषेक नालकर याने घरात घुसून अंगाशी झटापट करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात अभिषेक तुकाराम नालकर (रा. चिंचविहिरे, ता. राहुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षकप्रताप दराडे व हवालदार डी. एन. गर्जे करीत आहेत. दरम्यान, राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस छेडछाड, विनयभंगाच्या घटना वाढत असताना पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी छेडछाड, विनयभंगाबाबत तक्रारी असल्यास न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केल्यामुळे याबाबत गुन्हे दाखल होऊन रोडरोमिओ, टवाळखोरांना आळा बसत आहे.

Back to top button