नगर : शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळला | पुढारी

नगर : शिवसेनेने पाकिस्तानचा झेंडा जाळला

नगर; पुढारी वृत्तसेवा: पुण्यात पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा देण्यात आल्या, त्याच्या निषेधार्थ नगर शहर शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे पाकिस्तानच्या झेंडा जाळण्यात आला. यावेळी संजय शेंडगे, गिरीष जाधव, गणेश कवडे, संतोष गेनप्पा, सचिन शिंदे, योगिराज गाडे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, अरुणाताई गोयल, अभिजित अष्टेकर, पप्पू भाले, मृणाल भिंगारदिवे, महेश शेळके, संदीप दातरंगे, गणेश झिंजे, अमित लड्डा, अरुण झेंडे, प्रताप गडाख, सुशांत कोकाटे, अभी दहीहांडे, प्रकाश थोरात, अक्षय रासकर आदी उपस्थित होते.

संभाजी कदम म्हणाले, पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. त्या घटनेने संपूर्ण देशभरातून चिड निर्माण झाली आहे. ज्या देशात रहाचे, त्यांचेच खायचे आणि पाकिस्तान झिंदाबाद म्हणायचे अशांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन् ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांना पाकिस्तानात पाठवून देण्याची व्यवस्था सरकारने करावी म्हणजे देशातील घाण बाहेर जाईल. देशात हिंदुत्वावाद्यांचे सरकार आहे, असे म्हणतात तरी अशा घटना घडताच कशा, असा प्रश्न उपस्थित केला. पुन्हा अशा घटना घडणार नाही, यांची जबाबदारी सरकारने घ्यावी.

Back to top button