नगर : व्यापार्‍याचे 25 हजार लंपास | पुढारी

नगर : व्यापार्‍याचे 25 हजार लंपास

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील स्टेशन रस्त्यावर नेवासकर पेट्रोल पंपासमोरून एका व्यापार्‍याची 25 हजार रूपये रोकड असलेली बॅग चोरट्याने पळविल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  याबाबत केदार रमेश बडवे (रा. हिरवे गल्ली, नालेगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

फिर्यादी बडवे हे व्यावसायिक असून कामानिमित्त शुक्रवारी स्टेशन रोडवरील नेवासकर पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या दुकानात गेले होते. त्यांच्याकडील बॅगेत 25 हजारांची रोकड तसेच बँकेचे चेकबुक होते. चोरट्यांने फिर्यादी यांची नजर चुकवून बॅग पळवून नेली आहे. या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

Back to top button