भातकुडगाव फाट्यावर बस थांबवा, पालक वर्गातून मागणी | पुढारी

भातकुडगाव फाट्यावर बस थांबवा, पालक वर्गातून मागणी

भातकुडगाव : पुढारी वृत्तसेवा :  दहिगाव-ने मुक्कामी एसटी बस येत नसल्याने सकाळी शेवगाव व इतर ठिकाणी शाळा-महाविद्यालयांत जाण्यासाठी वेळेवर बस नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. भातकुडगाव फाटा येथून शेवगाव शहरात जाणार्‍या सर्व बस विद्यार्थ्यांसाठी थांबाव्यात, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. शेवगाव शहरात सकाळी 8 वाजता भरणार्‍या शाळेतील विद्यार्थी थेट 9 वाजता शाळेत पोहचत आहेत.

गावातून एसटी बस 8 किंवा 8/30 ला येत असल्याने जाण्यास उशीर होऊन विद्यार्थ्यांचे सुरुवातीच्या दोन तासाचे नुकसान होत आहे. तेव्हा विद्यार्थी व पालक वर्ग मुक्कामी बसची मागणी करात आहेत. मुक्कामी बस सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना सकाळी वेळेत शाळेत जाण्याची व रात्री उशीर झाला, तरी घरी पोहोचवण्याची हमी मिळणार आहे. अशा परिस्थितीत सध्या विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी खासगी वाहनचा आधार घेतात. वेळेत शेवगाव आगारातून ग्रामीण भागात मुक्कामी बस सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

Back to top button