विकासासाठी निधी कमी पडणार नाही : आमदार रोहित पवार | पुढारी

विकासासाठी निधी कमी पडणार नाही : आमदार रोहित पवार

जामखेड : पुढारी वृतसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येक गावात मूलभूत सुविध उपलब्ध करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रोहित पवार यांनी दिली. जवळा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार पवार यांच्या हस्त झाले.. यावेळी जवळा ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 7 लाख रुपये किमंतीची घंटा गाडीचे लोकार्पण करण्यात आले. आमदार पवार म्हणाले की, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील असून, प्रत्येक गावाला निधी उपलब्ध करून देत आहे. तसेच 25/15 च्या माध्यमातून ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांसाठी देखील मोठा निधी उपलब्ध केला आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांच्या माध्यमातून देखील मोठा निधी उपलब्ध करीत आहे.

त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे सांगतानाच निधी मिळविण्यासाठी सातत्याने राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये पाठपुरावा सुरू आहे, असेे ते म्हणाले. जवळा येथे 25/15 मधील निधीतून खेत्रे घर ते प्रदीप दळवी घर, विठ्ठल मंदिर ते मासोळे घर या रस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच जवळा प्राथमिक शाळेसाठी 340 मीटर संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाल्याने त्याचे देखील लोकार्पण करण्यात आले.

समाजकल्याण विभागामार्फत जवळा गावठाणांतर्गत पथदिवे, भीमनगर येथे सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या निधीतून 10 लाख रुपये खर्चाचा सिमेंट रस्ता, गोयकर वाडीत 25/15 निधीतून सिमेंट रस्ता, तसेच जवळा गावासाठी कचरा मुक्त करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी जि. प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करीत घन कचरा व्यवस्थापनचे देखील भूमिपूजन करण्यात आले.

जवळा गावातील नागरिकांची मूलभूत प्रश्नांसाठी आमदार पवार यांनी मोठा निधी उपलब्ध केल्याने, तसेच अनेक वर्षांची नागरिकांची रस्त्याची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले आहे. यावेळी सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळूंजकर, युवा नेते राहुल पाटील, माजी सभापती सुभाष आव्हाड, दीपक पाटील, युवा सेना सावता हजारे, ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रपाल आव्हाड, दयानंद कथले, गणेश चव्हाण, कल्याण आव्हाड, मिलिंद आव्हाड, भानुदास रोडे, संजय आव्हाड, अशोक पठाडे , जीवन रोडे, अमोल हजारे, राम हजारे, अविनाश पठाडे, समीर शेख, राहुल हजारे, लुकमान सय्यद, संदेश हजारे, ग्रामविकास अधिकारी बबन बहिर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आश्वासनपूर्तीचे समाधान : शिंदे
जवळा गावात गेल्या अनेक वर्षांची घंटा गाडीची मागणी नागरिकांची होती. ती मागणी पूर्ण करू, असे निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करताना आनंद होत असल्याचे सरपंच प्रशांत शिंदे यांनी सांगितले. तसेच आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गावाचा विकास होत असून, विविध विकासकामे सुरू आहेत. जवळा फाटा ते लाकडी गिरण 1 कोटीच्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जवळा गावाच्या वैभवात भर पडणार आहे.

Back to top button