नगर : काम वाटपात अधिक पारदर्शकता येणार : सीईओ येरेकर | पुढारी

नगर : काम वाटपात अधिक पारदर्शकता येणार : सीईओ येरेकर

नगर, पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा परिषदेची स्मार्ट जिल्हा परिषदेकडे वाटचाल सुरू आहे. याअंतर्गत बांधकाम विभागाने काम वाटपात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी स्मार्ट सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषदेत या नवीन सॉफ्टवेअरचे लाँचींग आशिष येरेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, निखिलकुमार ओसवाल, मनोज ससे, संदीप सांगळे, कार्यकारी अभियंता प्रविण जोशी, शंकर किरवे, रेश्मा होजगे, सुरेश शिंदे, पायरंग गायसमुद्रे, धनंजय आंधळे, आनंद रुपनर आदी उपस्थित होते.

सीईओ येरेकर म्हणाले, काम वाटपाची दोन स्तरीय रचना असून पहिल्या टप्प्प्यात सर्व कामे सुशिक्षित बेरोजगार, मजूर संस्था व खुला प्रवर्ग यांच्यात विभागली जातील. नंतर कामासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना लॉटरी पध्दतीने समप्रमाणात कामे दिली जातील. 33 टक्के सुशिक्षित बेरोजगार, 33 टक्के मजूर संस्था, 34 टक्के खुल्या प्रवर्गासाठी अशी विभागणी अधिक पारदर्शक व अचूक होण्यास मदत होणार आहे.

जिल्हा परिषदेकडील नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार, मजूर संस्थांनी सदर सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button