नगर : जवळा परिसरात रिफिलिंगचा धंदा | पुढारी

नगर : जवळा परिसरात रिफिलिंगचा धंदा

जवळा, पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील दोन बड्या गॅस वितरकांकडून गॅसचा काळा बाजार होत असून, घरगुती गॅसच्या टाक्या रिफिलिंग करून त्यांचा व्यवसायिक वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जास्त आर्थिक फायद्यासाठी हा उद्योग अनेक ठिकाणी चालू असल्याचे दिसून येते.

जवळा परिसरात दिवसा सर्रास पणे घरगुती गॅसचा व्यवसायिक वापर अनेक गोष्टीत तेजीत सुरू आहे. पुरवठा विभाग माहिती असूनही गपपडीची भूमिका घेत असल्याने परिसरातील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. जवळा परिसरात घरगुती गॅसचा वापर व्यवसायिक टाक्यात भरण्याचा काम कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे, आता जनतेला सांगायची गरज राहिली नाही. गावात व परिसरात रिफिलिंग करून वाहने, हॉटेल्स, वेल्डिंग दुकानदार आदी ठिकाणी काळाबाजार करून वापरत आहेत. परंतु, पुरवठा विभाग व पोलिस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत आहे.

कारवाईची नागरिकांची मागणी

लोकांना मात्र वेळेला घरगुती गॅस मिळत नाही; परंतु या वसायिकांना मात्र सहजा सहजी उपलब्ध होतो. त्यामुळे घरगुती गॅस धरकांची कुचंबना होत आहे. तरी, संबंधीत वरिष्ठ विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन गॅसचा काळाबाजार करणार्‍यांवर कारवाई करण्यांची मागणी होत आहे.

Back to top button