नगर : निंभेरे गावातील प्रश्न सोडविण्याची मागणी | पुढारी

नगर : निंभेरे गावातील प्रश्न सोडविण्याची मागणी

झरेकाठी, पुढारी वृत्तसेवा : निंभेरे येथील गावातील प्रलंबित प्रश्न सोडवावेत, अशी मागणी निंभेरे येथील राष्ट्रवादीचे नेते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मंजाबापू चोपडे यांनी राज्याचे माजी जलसंपदामंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील व माजी राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्याकडे केली आहे.

आमदार निधीतून, निंभेरे येथील ग्रामपंचायतच्या जलजीवन योजनेअंतर्गत एक कोटी एकोणावीस लाख निधी, तसेच तलाठी कार्यालयास बांधकामासाठी 25 लाख निधी दिल्याबद्दल माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील व माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांचे आभारही मानले.

यावेळी निभेरे येथील लोकनियुक्त सरपंच अलका सिनरे, तुळापूर येथील सरपंच हिराबाई हारदे, प्राध्यापक विजय सिनारे, कानडगाव येथील माजी सरपंच डॉक्टर रवींद्र गागरे, राजेंद्र सिनेरे, चंद्रकांत विधाते उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे यांनी चोपडे यांच्या घरी कुटुंब समवेत स्नेहभोजन केले. मुक्ताबाई मंजाबापू चोपडे, निंभेरे येथील सरपंच अलका सिनारे, चैताली हारदे यांनी त्यांना राख्या बांधल्या.

Back to top button