विखेंच्या मंत्रीपदाने राशीनला जल्लोष! | पुढारी

विखेंच्या मंत्रीपदाने राशीनला जल्लोष!

राशीन :  पुढारी वृत्तसेवा : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रथम क्रमांकाची शपथ घेण्याची संधी मिळाल्याचा जल्लोष राशीन येथील भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून साजरा केला.
राशीन येथील दौंड- उस्मानाबाद मुख्य रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी करीत, पेढे वाटप करून घोषणा देण्यात आल्या.

यावेळी युवक नेते भीमराव साळवे , भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता गोसावी, भाजपचे राशीन शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, भाजप ओबीसी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष सोयब काझी, डॉ. राजकुमार आंधळकर, भाजपा युवा मोर्चाचे संकेत पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तात्यासाहेब माने, योगेश शर्मा, साहिल काझी, ग्रामपंचायत सदस्य दीपक थोरात, मोहन सायकर, कपडेचे माजी सरपंच युवराज हाके , किशोर साळवे, सूरज परदेशी, अमोल शेटे, रवी साळवे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर कर्जत तालुक्यासह राशीन परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Back to top button