खरवंडीत पालावर फडकला तिरंगा

खरवंडी कासार : पुढारी वृत्तसेवा : सध्या पक्के घर नसले म्हणून काय झाले? राहण्यासाठी निवारा असणारे पाल हेच माझे घर माझ्या देशाचा मला अभिमान आहे. माझ्या घरावर तिरंगा ध्वज लावला आहे. सध्या घर नसले तरी काय झाले. भविष्यात घर होईलच, अशी सकारात्मक उर्जा मनाशी बाळगत खरवंडी कासार येथे पालात राहणार्‍या कुटुंबानीही तिरंगा ध्वज फडकवत देशाबददल मनात स्वाभिमान व अभिमान ठासून भरलेला दाखऊन दिला आहे.

खरवंडी कासार येथे 25 ते 30 वर्षांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी आलेली घिसाडी समाजाची दहा बारा कुटूंब आता खरवंडीचे रहिवाशी झाले आहेत. ग्रामपंचायतीकडून काही कुटुंंबाना घरकुलही मजुंर आहेत. काहीच्या घरकुलां बाधंकाम झाले आहे. काहीचे बाधंकाम चालू आहे, तर काही ना जागा नसल्याने घरकुलाचा लाभ घेता आला नाही. समाजामधील अशा देश आभिमानी कुटुंबांना खर्‍या अर्थाने शासकीय लाभ मिळणे गरजेचे आहे.

दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खरवंडी कासार व परिसरातील गावांमध्ये विविध संस्था, प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. ग्रामपंचायती, सहकारी संस्था, सरकारी कार्यालयांत झालेल्या कार्यक्रमांना स्थानिक पदाधिकारी, सदस्य, सरकारी अधिकारी, अंगणवाडीसेविका, आरोग्य कर्मचारी व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांचीही जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Exit mobile version