नगर-मनमाड रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा | पुढारी

नगर-मनमाड रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : नगर ते कोपरगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात शिर्डी- नगर रस्ता बेमुदत बंद करण्याचे निवेदन रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, गेल्या 3 वर्षांपासून नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करून प्रशासनास जागे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. वर्षात शासनाकडून 500 कोटींचा निधी रोडच्या कामाला मंजूर झाला, परंतु रोडचा ठेकेदाराने काम परवडत नसल्याचे, तसेच इतर कारणे देऊन नगर-मनमाड रोडचे काम अर्धवट सोडून दिले. या अधर्वट सोडलेल्या कामांमुळे, तसेच मुसळधार पावसामुळे रोडची अक्षरशः चाळण झाली आहे.

खड्ड्यांमुळे अपघातात अनेकांनी जीव गमावले आहेत. 14 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविले नाहीत, तर स्वातंत्र्य दिनी नगर- मनमाड रस्ता ठिकठिकाणी बंद करण्यात येणार आहे. हे निवेदन देण्यास वसंत कदम, देवेंद्र लांबे, सतीश घुले, अमोल वाळुंज, कांता तनपुरे, विनायक बाठे, वैभव गाडे, सचिन म्हसे, किरण चव्हाण, सुनील विश्वासराव, राजू बोचकारे, फारूख शैख, ज्ञानेश्वर मोरे, पठाण नसीब, अक्षय डौले आदी उपस्थित होते.

Back to top button