नगर : राहुरीत विवाहितेचा मानसिक छळ | पुढारी

नगर : राहुरीत विवाहितेचा मानसिक छळ

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : लग्नात व्यवस्थित मानपान दिला नाही, हुंडा दिला नाही, माहेरहून 50 हजार रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरूणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी सासरच्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑक्टोबर 2014 ते 14 मार्च 2017 या दरम्यान सविता सोपान खिलारी (वय 29, रा. बेबेओहोळ ता. मावळ, जि. पूणे. हल्ली राहणार वांबोरी, ता. राहुरी) ही विवाहित तरूणी तिच्या सासरी (ता. मावळ, जि. पुणे) येथे नांदत होती. या दरम्यान आरोपी सविता खिलारी हिला म्हणायचे ‘तुझ्या माहेरच्या लोकांनी आमच्या लग्नात मानपान दिला नाही, तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही, तुला दवाखान्यासाठी 50 हजार रुपये आण’, असे सांगितले. या कारणावरुन सासरच्या लोकांनी तिला वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण केली. उपाशी पोटी ठेवून तिचा मानसिक छळ केला. तसेच, तिला मारण्याची धमकी दिली.

सविता सोपान खिलारी हिच्या फिर्यादीवरून आरोपी सोपान ज्ञानदेव खिलारी, इंदूबाई ज्ञानदेव खिलारी (दोघे रा. बेबेओहळ, ता. मावळ, जि. पुणे), नणंद उज्ज्वला बाबासाहेब कर्डिले, बाबासाहेब सुखदेव कर्डिले (दोघे रा. सोनई, ता. नेवासा), रंजना रामदास लबडे, रामदास बबन लबडे (रा.पिंपरी, ता. संगमनेर), रूपाली अनिल गवळी (रा.नेवासा, ता. नेवासा) या सात जणांवर गुन्हा हुंडाबळी, मारहाण व शिवीगाळ करुन शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार वाल्मिक पारधी हे करीत आहेत.

Back to top button