नगर : नुकसानीच्या पंचनाम्यांचे अहवाल सादर करा : नामदार काळे | पुढारी

नगर : नुकसानीच्या पंचनाम्यांचे अहवाल सादर करा : नामदार काळे

कोळपेवाडी, पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपासून सातत्याने पावसाची संततधार सुरु असून, मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे अहवाल तातडीने शासनदरबारी पाठवा, अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी आढावा बैठकीत प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

तहसील कार्यालय कोपरगाव येथे ना. काळे यांनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात बैठक घेऊन महसूल व कृषी विभागाकडून सविस्तर माहिती घेतली व महसूल विभागाच्या ‘विजय सप्तपदी’ अभियानासंदर्भात आढावा बैठक घेतली. याप्रसंगी प्रशासकीय अधिकार्‍यांना त्यांनी सूचना केल्या. तसेच कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील दफनभूमी व स्मशानभूमीच्या नागरिकांच्या अडचणी आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी दफनभूमी व स्मशानभूमीचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावा, अशा सूचना दिल्या.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकरराव रोहोम, अनिल कदम, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, सुरेश जाधव, शंकरराव चव्हाण, विष्णू शिंदे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, सुनील शिंदे, सुधाकर होन, चांगदेव आगवन, शांताराम डुबे, रामनाथ वैराळ, सुनील बोरा, शशिकांत देवकर, अशोक भोकरे, नानासाहेब चौधरी, दिगंबर बढे, सचिन वाबळे, शशिकांत वाबळे, लालू शेख, शमशुद्दीन शेख, चंद्रशेखर गवळी, सुनील चव्हाण, धनराज पवार, बाळासाहेब पवार, भाऊसाहेब भाबड, जनार्दन पारखे, किरण दहे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य, अभियंता अतुल खंदारे उपस्थित होते.

Back to top button