नगर : संधी न दिल्यास स्वबळाचा नारा देणार : थोरात | पुढारी

नगर : संधी न दिल्यास स्वबळाचा नारा देणार : थोरात

संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला प्रास्थपितांनी रिपब्लिकन पक्षासह विविध चळवळीतील कार्यकर्त्यांना सन्मानाने निवडणूक लढविण्याची संधी उपलब्ध न केल्यास ओबीसींसह आदिवासी, दलित, ख्रिश्चनांसह विविध चळवळीची एकजूट करून स्वबळाचा नारा देत सर्वसामान्य चळवळीतील माणसाला सत्तेची संधी उपलब्ध करून देणार आहे, असा इशारा रिपाइं (आठवले) चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला.

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे रिपब्लिकन, आदिवासी व ख्रिश्चन समाजाच्या संयुक्त’ कार्यकर्ता निवडणूक चिंतन बैठकीप्रसंगी थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष अशोक खरात होते. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, जिल्हा विभागप्रमुख भीमा बागूल, जिल्हा युवाध्यक्ष पप्पू बनसोडे, रिपाइं तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष अनिल बर्डे, ख्रिश्चन समाज संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर रुपवते, महिला आघाडी तालुकाध्यक्षा रुपाली सोनवणे, धनगर समाज महिला आघाडी तालुकाध्यक्षा मीना बिडगर, योगेश मुन्तोडे, विजय कदम, नाना पाळंदे, रमेश भोसले, बाळासाहेब कदम, भारत शेवाळे, केरूनाथ भोसले, गणेश गायकवाड, अ‍ॅड. रवी शेळके, नानासाहेब कदम आदी उपस्थित होते.

सुरेद्र थोरात म्हणाले, यापुढे संधी निर्माण करून घेणार आहोत. यासाठी स्वबळाचा नारा निश्चित देवू. यावेळी भीमा बागूल यांनी मार्गदर्शन केले.

Back to top button