नगर : तीस जणांवर तडीपारीची कारवाई | पुढारी

नगर : तीस जणांवर तडीपारीची कारवाई

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : मोहरम आणि गोपाल काला सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या 30 जणांना सीआरपीसी 144 ची नोटीस देण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती संगमनेर शहराचे पो. नि. मुकुंद देशमुख यांनी दिली.

आगामी काळात विविध सण, उत्सव साजरे केले जाणार आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार, तसेच सार्वजनिक सण, उत्सवाच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, आगामी येणारे सर्व सणोत्सव शांततेत पार पडावेत, यासाठी गुन्हे दाखल असलेल्या 30 जणांवर ठराविक कालावधीकरिता तडीपारी, तर 25 जणांवर वेगवेगळ्या कलमांन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सर्व सण-उत्सव शांततेत साजरे करावेत, असे आवाहनही पोलिस निरीक्षक देशमुख यांनी केले आहे.

Back to top button