बंद घर फोडून 40 हजार लांबविले

बंद घर फोडून 40 हजार लांबविले
Published on
Updated on

वाळकी : बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरातील कपाटात ठेवलेली 40 हजार रुपयांची रोकड लांबविली. ही घटना नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात गुरुवारी (दि.4) दुपारी 12.30 ते 1.30 या कालावधीत घडली. याबाबत दत्तात्रय साहेबराव कोकाटे (रा.चिचोंडी पाटील, ता.नगर) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोकाटे हे नोकरदार असून, ते ड्युटीवर गेलेले होते. तसेच, त्यांचे कुटुंबिय कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेलेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेली 40 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news