जामखेडमध्ये 111 फूट तिरंगा यात्रा | पुढारी

जामखेडमध्ये 111 फूट तिरंगा यात्रा

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय परिषदेतर्फे 111 फूटी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरात पहिली भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली असून, यामध्ये जामखेडकरांनी उत्साहत व आनंदात सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. अखील भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डपासून 111 फूट लांबीचा तिरंगा ध्वज यात्रा सुरू झाली. यावेळी माजी सैनिकांनी उपस्थिती होती. अभाविप दक्षिण नगर जिल्हा संयोजक अथर्व पाडळे यांनी यात्रेच्या आयोजनाचा उद्देश मांडला.

यावेळी नगर विभाग संघटनमंत्री ओंकार मगदूम, दक्षिण संघटनमंत्री चेतन पाटील, विवेक कुलकर्णी, शिवनेरी अ‍ॅकॅडमीचे लक्ष्मण भोर, ल. ना. होशिंग विद्यालय व जामखेड महाविदयाल जामखेडचे विद्यार्थी, ऋषिकेश मोरे, सुरज निमोणकर, अविराज डुचे, प्रथमेश कोकणे, कुणाल खटके, जय देशपांडे, ऋषिकेश ठांगील, ओम मोरे, कृष्णा बुरांडे, निखिल आवारे, साहिल भंडारी, शुभम धनवडे, प्रसाद होशिंग आदी उपस्थित होते.

Back to top button