नेवासा : चोरट्यांची अजब चोरीची गजब कहाणी | पुढारी

नेवासा : चोरट्यांची अजब चोरीची गजब कहाणी

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा फाटा येथे मोटारसायकल चोरट्यांची अजब चोरीची गजब कहाणी पाहून ग्रामस्थही अवाक झाले, यानंतर ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. या तीन चोरट्यांना पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले. नेवासा फाटा येथील आंबेडकर चौका समोर असलेल्या एका टायर पंक्चर दुकानासमोर बुधवारी (दि.3) रात्री पाऊणे दहा वाजता सराईत तीन दुचाकी चोरट्यांना चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली करण्याची घटना घडली.

या चोरट्यांच्या दुचाकीचोरी करण्याची पद्धत होत की, गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या दुचाकींच्या चाव्या चोरायच्या आणि त्याचा चाव्या वापरून इतर गाड्या चोरायच्या. नेवासा फाटा येथील गर्जे फिटर यांच्या गॅरेजमध्ये या चोरट्यांनी उभ्या असलेल्या दुचाकींच्या चाव्या काढून पळालेले सीसीटिव्हीत कैद झाले आहेत. यामुळे फिटरच्या जागृतपणामुळे या सराईत चोरट्यांना नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात एका टायर पंक्चर दुकानासमोर पकडण्यात आले.

युवकांनी या चोरट्यांना चांगलाच चोप देवून घटनेची माहिती नेवासा पोलिसांना दिली. नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय करे यांनी पोलिस फौजफाटा घटनास्थळी पाठविला. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल राहूल यादव यांनी चोरट्यांना ताब्यात घेतले असून, आता या चोरट्यांच्या पर्दाफाश नेवासा पोलिस करणार आहे. या चोरट्यांकडून चोरींच्या गाड्यांचा अधिक तपास लागू शकतो असे पोलिसांनी सांगितले. चोरटे औरंगाबाद परिसरातील असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Back to top button