नगर : जिल्ह्यात आढळले 50 कोरोनाबाधित | पुढारी

नगर : जिल्ह्यात आढळले 50 कोरोनाबाधित

नगर : जिल्ह्यात गुरुवारी 50 कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये नगर शहरातील 8 जणांचा समावेश आहे. याशिवाय श्रीरामपूर तालुक्यात 6, नगर ग्रामीण 5, संगमनेर 5, मिलिटरी हॉस्पिटल 4, पाथर्डी 4, इतर जिल्ह्यांतील 3, राहुरी 3, शेवगाव 3, श्रीगोंदा 3, पारनेर 2, अकोले, भिंगार, कर्जत व कोपरगाव या चार तालुक्यांत प्रत्येकी 1 जण बाधित आढळला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 3 लाख 97 हजार 37 इतकी आहे. गुरुवारी 86 रुग्णांना डिस्जार्च देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3 लाख 89 हजार 455 वर पोहोचली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के इतके आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 7 हजार 229 जणांचा मृत्यू झाला.

Back to top button