केंदळ खुर्द येथे प्रभागनिहाय सोडत | पुढारी

केंदळ खुर्द येथे प्रभागनिहाय सोडत

वळण : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द येथील होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 9 जागांसाठी एकूण 3 प्रभाग निहाय सोडत नुकतीच ग्रामस्थ व विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये 5 महिला व 4 पुरुष सदस्य असणार असल्याने केंदळ खुर्दमध्ये महिला राज्य येणार असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग 1 मध्ये, सर्वसाधारण व्यक्ती एक, अनुसूचित जमाती महिला 1 व सर्वसाधारण महिला 1, प्रभाग 2 मध्ये, अनुसूचित जमाती व्यक्ती 1, सर्वसाधारण व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 1, तर प्रभाग 3 मध्ये, अनुसूचित जाती व्यक्ती 1, सर्वसाधारण महिला 1, इतर मागास प्रवर्ग महिला 1 याप्रमाणे आगामी ग्रामपंचायत सदस्य असतील.

दरम्यान, या निवडीप्रसंगी सरपंच वृषाली आढाव, माजी सरपंच अनिल आढाव, संदीप आढाव, सोसायटी चेअरमन उद्धव आढाव, शिवाजी आढाव, मच्छिंद्र आढाव, तंटामुक्तीचे अध्यक्ष धोंडीराम आढाव, पंढरीनाथ आढाव, राजेंद्र आढाव, बाळासाहेब आढाव आदींसह ग्रामपंचायत, सोसायटी सदस्य व ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित होते. आगामी ग्रामपंचायत सदस्य कोण असतील, याची उत्सुकता आहे.

Back to top button