श्रीरामपूर : बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक | पुढारी

श्रीरामपूर : बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची लूज मार्केटमध्ये 107 साधने आली. एकूण 1738 क्विंटल आवक झाली. एक नंबर कांद्याला 850 ते जास्तीत जास्त 1251 रु. क्विंटल, दोन नंबर कांद्यास 550 ते 800 व तीन नंबर कांद्यास 300 ते 500 क्विंटल, तसेच गोल्टी कांदा कमीत कमी 750 ते जास्तीत जास्त 950 रुपये बाजारभाव निघाले.

शेतकर्‍यांनी आपला कांदा मार्केटमध्येच विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी केले आहे.
भुसार मार्केटमध्ये हरभरा या शेतमालाची 14 क्विंटल आवक झाली. 4000 ते 4500 व सरासरी रुपये 4250 भाव निघाले. सोयाबीन या शेतमालाचे 10 क्विंटल आवक झाली. 5100 ते 6250 व सरासरी 5900 भाव निघाले.

बटाट्याची 244 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 18 रुपये व जास्तीत जास्त 20 रुपये किलो व सरासरी 19 रुपये किलो या दराने निघाले. शेवगा शेंगाची 244 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 30 रुपये किलो, तर जास्तीत जास्त 40 व सरासरी 35 रुपयांचा दर निघाला. कारल्याची 10 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 20 रुपये व जास्तीत जास्त 30 रुपयांचा भाव मिळाला. गवार शेंगाची 3 क्विंटल आवक झाली भाव 35 ते 40 रुपयांचा मिळाला. बीटची 2 क्विंटल आवक होऊन 40 ते 60 रुपयांचा दर मिळाला. डाळिंबाची 39 क्विंटल आवक होऊन 20 ते 40 रुपयांचा प्रतिकिलो भाव मिळाला. भेंडीस 20 ते 30 रुपयांनी विक्री झाली.

Back to top button