नगर : हॉटेल चालकाने केली आत्महत्या | पुढारी

नगर : हॉटेल चालकाने केली आत्महत्या

नगर : सावेडी उपनगरातील हॉटेल व्यावसायिकाने विहिरीत जीव देऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अनिल तुकाराम ढवण (वय 42, रा. ढवण वस्ती, तपोवन रोड, सावेडी) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ढवण हे रविवार रात्री पासून बेपत्ता होते. या प्रकरणी सोमवारी (दि. 1 ऑगस्ट) सकाळी ढवण यांच्या नातेवाईकांनी तोफखाना पोलिस ठाण्यात अनिल ढवण बेपत्ता झाले असल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, सोमवारी दुपारी ढवण यांचा मृतदेह तपोवन रोड परिसरातील कादंबरीनगर येथील एका विहिरीत आढळून आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस अंमलदार बाळासाहेब गिरी करीत आहेत. ढवण यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button