नगर : खासगी सावकारकीतून प्लॉटचा केला व्यवहार | पुढारी

नगर : खासगी सावकारकीतून प्लॉटचा केला व्यवहार

नगर : पुढारी वृत्तसेवा : खासगी सावकारकीतून प्लॉटचा व्यवहार झाल्याचे तालुका उपनिबंधकांच्या चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात शिवशंकर शांतीलाल भंडारी (रा. दाळमंडई) या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
उपनिबंधक कार्यालयातील अल्ताब शेख यांनी फिर्याद दिली आहे.

अभय रामलाल ललवाणी यांनी 9 फेब्रुवारी 2021 च्या सावकारी व्यवहारात दिलेले गहाणखत रद्द होण्याबाबत उपनिबंधक कार्यालयात अर्ज दिला होता. जिल्हा उपनिबंधकांनी 12 फेब्रुवारी 2021 रोजी तालुका उपनिबंधकांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. दोन पथकांनी सावकार शिवशंकर भंडारी याच्या राहत्या घरी व कार्यालयात पंचनामा केला होता. सुनावणी झाल्यानंतर पथकाने 19 एप्रिल 2022 रोजी मिळकतीची प्रत्यक्ष पाहणी केली होती.

Back to top button