नगर : सारोळा कासारला दर्ग्यातील दानपेटी पळविली | पुढारी

नगर : सारोळा कासारला दर्ग्यातील दानपेटी पळविली

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील सारोळा कासारचे ग्रामदैवत हजरत निर्गुणशाहवली बाबांच्या दर्ग्यातील दानपेटी चोरट्यांनी पळविली. ही घटना मंगळवारी (दि.2) पहाटेच्या घडली. अनेक दिवसांपासून दानपेटी उघडली नसल्याने त्यात किती रक्कम होती, याची निश्चित माहिती मिळू शकली नाही.

सारोळा कासार परिसरातील दोन शेतकर्‍यांच्या प्रत्येकी दोन जर्शी गायी, एका शेतकर्‍याची शेळी, विहिरीवरील पाणबुडी मोटार, दोन शेतकर्‍यांची चंदनाची झाडे चोरट्यांनी गेल्या 15-20 दिवसांत चोरली आहेत. त्यातच गावठाणातील हजरत निर्गुणशाहवली बाबांच्या दर्ग्यातही चोरी झाली आहे.

सारोळा-खडकी रस्त्यावर नाह्यार परिसरात नदीवरील बंधार्‍याशेजारील शेतकरी नामदेव पाटील यांना शेतात मंगळवारी (दि.2) दुपारी दानपेटी पडलेली दिसली. त्यानंतर ग्रामस्थांनी गर्दी केली. दर्ग्याची व्यवस्था पाहणारे प्रा. शहाजान तांबोळी व इतरांनी शेतात जाऊन पेटी पाहिली असता, ती दर्ग्यातील असल्याचे त्यांनी ओळखले. त्यानंतर नगर तालुक्याचे पोलिस नाईक बाळासाहेब कदम व हवालदार सुभाष थोरात यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गावच्या परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Back to top button