नगर : लिंपणगावमध्ये तुंबळ हाणामारी

नगर : लिंपणगावमध्ये तुंबळ हाणामारी
Published on
Updated on

श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या मोजणीवरून तालुक्यातील लिंपणगाव येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बापू माने आणि त्यांच्या मुलास बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी लिंपणगाव येथील 13 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.

लिंपणगाव येथील अशोक जयवंत ओहोळ यांनी गट नं. 236 मध्ये 40 आर शेतजमीन 25 ऑगस्ट 2021 रोजी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बापू माने यांना विकली होती. या जमिनीच्या शेजारी प्रवीण कुरूमकर यांची जमीन असून, या दोघांत जमिनीच्या हद्दीवरून वाद असल्याने जमिनीची मोजणी करून ताबा माने यांना देण्यासाठी शासकीय मोजणी बोलाविली होती.

पोलिसांच्या उपस्थितीतच घडला प्रकार

मंगळवारी (दि.2) सकाळी 11 वाजता पोलिस बंदोबस्तात मोजणी सुरू केली असता, प्रवीण कुरूमकर, संतोष भोंडवे, किरण भोंडवे, सागर भोंडवे, ताराबाई भोंडवे, शुभांगी कुरूमकर, मनीषा भोंडवे, संभाजी सूर्यवंशी, विजय कुरूमकर, उमेश वेताळ, मयूर चव्हाण, हनुमंत रेवगे, नीता पंधरकर यांनी मोजणी ठिकाणी येऊन अशोक ओहोळ यांना जातीवाचक शिवीगाळ करीत सोबत असलेल्या बापू माने व त्यांचा मुलगा उदय माने यांना शिवीगाळ केली. प्रवीण कुरूमकर याने उदय माने याच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले. त्याला वाचविण्यास गेलेल्या ओहोळ व बापू माने यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पुन्हा जमिनीचा ताबा घेण्यासाठी आल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.

दरम्यान, मोजणी करण्यासाठी गेलेले भूमी अभिलेख कार्यालयाचे गोरक्ष संतराम चव्हाण यांना मोजणी करण्यासाठी संतोष भोंडवे, सागर भोंडवे, ताराबाई भोंडवे, प्रवीण कुरूमकर या चार जणांनी मज्जाव केल्याने सरकारी कामात अडथळा निर्माण केला. चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी संतोष भोंडवे, सागर भोंडवे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, काल शेतातील कपाशी खुरपत असताना बापू माने व भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारीस तसेच प्रदीप सुदाम खामगळ, उदय माने, हनुमंत माने, तसेच सुशील शिंदे यांच्यासह इतर 5 ते 6 जणांनी एकत्र जमून जेसीबी मशीन व ट्रॅक्टर घेऊन येत शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी आल्याने त्यांना भोंडवे यांनी शेतीचा श्रीगोंदा न्यायालयात दावा दाखल आहे. त्याचा निकाल लागला नाही. तो न्यायप्रविष्ठ आहे, असे सांगताच बापू माने, उदय माने, प्रदीप खामगळ, सुशील शिंदे यांनी शेतजमीन काय तुमच्या बापाची आहे काय? शेताची मोजणी आजच झाली पाहिजे, असे सांगत शिवीगाळ, तसेच जबर मारहाण केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news