नगर : केबीसीच्या नावाखाली सव्वा लाखांना गंडविले | पुढारी

नगर : केबीसीच्या नावाखाली सव्वा लाखांना गंडविले

नगर, पुढारी वृत्तसेवा : ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये तुमचा मोबाईल नंबर लकी विनर म्हणून निवडला गेला आहे, असे सांगून 1 लाख 33 हजार 200 रूपयांना ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघउकिस आली आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सर्जेपूरा भागातील रामवाडी परिसरात लक्ष्मीमाता मंदिराजवळ राहणार्‍या 29 वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी 1 लाख 33 हजार 200 रूपयांना चुना लावला आहे. याबाबत सोमवारी फसवणूक झालेल्या व्यक्तीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना अज्ञात मोबाईल नंबरवरून तुमचा मोबाईल नंबर लकी विनर निवडला गेला असल्याचे सांगण्यात आले.

‘तुम्हाला कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून 25 लाख रूपये लॉटरीची रक्कम दिली जाणार असून त्यासाठी प्रोसेसिंग फी भरण्याचे सांगण्यात आले. सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना प्रोसेसिंग फी, टॅक्सच्या नावाखाली गुगल पे, आणि एका बॅक खात्यात पैसे पाठविण्याचे सांगितले. दि. 20 ऑगस्ट 2021 ते 10 मार्च 2022 या कालावधीत सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्याकडून तब्बल 1 लाख 33 हजार 200 रूपये उपसले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Back to top button