नगर : शेतमजुरांच्या प्रश्नी तहसीलवर मोर्चा | पुढारी

नगर : शेतमजुरांच्या प्रश्नी तहसीलवर मोर्चा

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : शेतमजुरांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करून त्यांना रोजगार, जमीन, घर, खाद्य सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, वेतन व सामाजिक न्याय यांस अनुसरून विविध 29 मागण्यांची सनद तातडीने मंजूर करावी, या करिता पुकारण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ व अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनच्या वतीने तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

यावेळी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना तहसीलदार, श्रीरामपूर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार मगरे यांनी निवेदन स्वीकारले.

देशव्यापी शेतमजूर परिषेदेत विविध संघटनांनी मंजूर केलेल्या 29 मागण्यांना घेऊन दि. 1 ऑगस्ट रोजी कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे जयंती दिनी देशभर देशव्यापी मागणी दिन साजरा करून निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात विविध मागण्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलनात श्रमिक महासंघाचे राज्याध्यक्ष कॉ. बाळासाहेब सुरुडे, कॉ. राजेंद्र बावके, कॉ. शरद संसारे, कॉ. जीवन सुरुडे आदी उपस्थित होते.

Back to top button