नगर : मढीत नाथभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन | पुढारी

नगर : मढीत नाथभक्तांनी घेतले समाधीचे दर्शन

मढी, पुढारी वृत्तसेवा : येथे कानिफनाथांचा प्रकट दिन हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपारी पध्दतीने उत्साहात करण्यात आला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. कानिफनाथांचा जय जयकार करत नाथांच्या संजवन समाधी व पादुकांचे विधिवत महापुजा करण्यात आले. नाथ भक्तांनी कानिफनाथांचा जन्मोत्सव उत्साहात आयोजित केला.

चैतन्य कानिफनाथांनी श्रावण शुद्ध चतुर्थीच्या दिवशी अवतार घेतला. रंगपंचमी, सर्व श्रावणी शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी राज्याच्या कानाकोपर्‍यातून नाथभक्त येथे दर्शनासाठी येतात. देवस्थान समिती व भाविकांच्या उपस्थित सकाळी जन्म उत्सवास प्रारंभ झाला. नवनाथ ग्रंथातील अवतार प्रकट होण्याच्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. स्थानिक महिला भजनी मंडळाच्या सदस्यांनी जन्माचा पाळण्याचे गायन करत विवीध मान्यवराच्या हस्ते पाळणा हलवण्यात आला.

यावेळी अशोक महाराज मरकड, देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड, विश्वस्थ रवींद्र आरोळे, श्यामराव मरकड, माजी सरपंच बाबासाहेब मरकड, लक्ष्मण महाराज मरकड, रामकिसन मरकड, भानूविलास मरकड, शरद कुटे, गोरक्ष मरकड, अर्जुन गाडेकर आदी उपस्थित होते. नाथांच्या पादुकांची गावामधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. अताषबाजी, ढोल ताषाचा निनाद परिसर दुमदुमुन गेला. मंदिरात दिवसभर भक्तांची वर्दळ होती. राहुरीच्या ओम चैतन्य अन्नपूर्णा अन्नछत्र मंडळातर्फे माहाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थान समितीतर्फे मढी येथे भाविकांच्या सुख-सुविधेसाठी विविध विकासकामे प्रगतीपथावर सुरू आहेत.झपाट्याने होत असलेल्या विकास कामाबाबत भाविकांनी समाधान व्यक्त केले.

Back to top button