संगमनेर : रंगकाम करणार्‍यांनी दागिने लांबविले

संगमनेर : रंगकाम करणार्‍यांनी दागिने लांबविले
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मोमिनपुरा परिसरात राहणार्‍या जाकीर अहमद शेख या रंगकाम करणार्‍या इसमाचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह एकूण 56 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या अगदी समोरच असलेल्या मोमिनपुरा परिसरात जाकीर अहमद शेख हा 28 वर्षीय तरुण रहात आहे. जाकीर शेख हे आपल्या घराला कुलूप लावून काही कामानिमित्त गुरुवारी बाहेरगावी गेले होते. तेथील कामकाज आटोपून शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते संगमनेरात परतले.

घरी येताच घराचे दार उघडे असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांच्या अनुपस्थितीत अतिशय गजबजलेल्या भागातील त्यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात इसमाने उघडून घरात प्रवेश केला व त्यांनी अतिशय कष्टाने जमा करुन ठेवलेली 24 हजारांची रोख रक्कम व दीड तोळे वजनाचे सोन्याचे पेंडल, मणी आणि कानातील डूल, तसेच दोन हजार रुपये किमतीचे पायातील चांदीचे पैंजण असा एकूण 56 हजारांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.

याबाबत जाकीर शेख यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मुकुंदा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मागील चोर्‍यांचा तपास लागलेला नसतानाही पुन्हा चोर्‍यांचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news