नगर : गणेशनगर-वाकडी रस्त्याची दुरवस्था | पुढारी

नगर : गणेशनगर-वाकडी रस्त्याची दुरवस्था

पुणतांबा, पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव आणि श्रीरामपूर या दोन तालुक्यांच्या हद्दींना जोडणारा, शिर्डी- शनिशिंगणापूर, प्रतिजेजुरी खंडोबा (वाकडी) यासह विविध देवस्थानांना ये-जा करण्यास, वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा गणेशनगर – वाकडी व्हाया औद्योगिक वसाहत श्रीरामपूर रस्त्याची पावसाने वाताहत झाली.

मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अबाल, वृद्धांसह शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून पायी चालणे मुश्कील झाले आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी प्रशासकीय यंत्रणेकडे केली आहे.
या रस्त्याच्या कामासाठी वाकडी हनुमान मंदिर येथे सरपंच डॉ. संपतराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सर्वपक्षीय कार्यकर्ते विठ्ठलराव शेळके, ‘गणेश’चे संचालक अ‍ॅड. भाऊसाहेब शेळके, अण्णासाहेब कोते, संदीपानंद लहारे, जि. प. माजी माजी सदस्य राजेंद्र लहारे, शिवाजी लहारे, सोसायटीचे अध्यक्ष भीमराज सहारे, बी. डी. शेळके, अनिल कोते, महेश जाधव, अमोल तहारे, सुभाष कापरे आदी उपस्थित होते.

Back to top button