नगर : रेनवडीच्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

नगर : रेनवडीच्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

पारनेर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील रेनवडी येथील रहिवासी व सध्या पुण्यात वास्तव्य असलेले तुषार रामभाऊ येवले याला जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असला, तरी पारनेर पोलिस ठाण्यात जामीन देण्यासाठी सक्षम जामीनदार आणावा, असे सांगितल्याचा राग आला. त्यामुळे पारनेरचे पोलिस उपनिरीक्षक हनुमान उगले यांना धमकवल्याप्रकरणी त्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला.

दुसरीकडे या घटनेतील आरोपी येवले यांनी आमचा आरोपी म्हणून उल्लेख का करता असे म्हणून जामीन घेण्यास सांगितल्यास बरे वाईट करण्याची धमकी दिल्याची फिर्याद पोलिस उपनिरीक्षक उगले यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार तुषार रामभाऊ येवले व वर्षा तुषार येवले ( दोघे अनुकृपा निवास, नवीन सांगवी, पुणे मूळ राहणार- रेनवडी, ता. पारनेर) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासबंधीची फिर्याद पोलिस उपनिरीक्षक हनुमान नाथा उगले यांनी दिली. आरोपीस अटकपूर्व जामीन मंजबर झाला आहे. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक उगले हे आरोपीचे अटकेची कारवाई करण्याकरिता काम करीत असताना त्यांनी आरोपीस जामीन आदेशातील अटी व शर्तीनुसार तुला अटक करतो व आपण लायक जामीनदार हजर केल्यास आपणास जामिनवर मुक्त करण्यात येईल, असे सांगीतले. त्याचा राग येऊन त्यांचे कक्षात आरडाओरड करत त्यांना धमकावले. त्यामुळे फिर्यादी त्यांना समजून सांगत असताना धमकी देवून दमदाटी करून फिर्यादीस मारहाण करून जखमी केले व फिर्यादी हे त्यांचे शासकीय काम करीत असताना दोघा पती – पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button