नगर : राशीन-थेरवडी रस्त्याची दुरवस्था | पुढारी

नगर : राशीन-थेरवडी रस्त्याची दुरवस्था

राशीन, पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील राशीन ते थेरवडी जुना रस्त्याची पावसामुळे दुरावस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय बनला आहे.

त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना चिखलातूनच मार्ग काढावा लागतो. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, तसेच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली. तोरकडवाडी, सोनळवाडी, कानगुडवाडी, थेरवडी या चार गावांमधून हा रस्ता जातो. संपूर्ण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

Back to top button