नगर : महामंडळाची पंढरपूर यात्रा 82 लाखांची..! | पुढारी

नगर : महामंडळाची पंढरपूर यात्रा 82 लाखांची..!

नगर, पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या नगर विभागाने पंढरपूर यात्रेसाठी जादा बसची व्यवस्था केली. या यात्रेव्दारे नगर विभागाला 81 लाख 93 हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. पावसामुळे भाविकांची संख्या रोडावली. त्यामुळे यंदा महामंडळाचे उत्पन्न घटले आहे.

तारकपूर आगाराहून पहिल्या दोन-तीन दिवस बस भाविकांनी भरुन गेल्या. आषाढी एकादशीच्या दोन दिवस अगोदर मात्र, पंढरीला जाण्यासाठी भाविकांची गर्दी नव्हती. पंढरपूरहून येणार्‍या भाविकांची गर्दी मात्र, अधिक होती. शेवगाव आगाराला सर्वाधिक 10 लाख 47 हजार रुपये उत्पन्न मिळाले. तारकपूर आगाराचे उत्पन्न 9 लाख 97 हजार एवढे झाले आहे. दोन वर्षांपूर्वी पंढरपूर यात्रेतून 1 कोटी 7 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा मात्र आर्थिक फटका बसला आहे.

आगारनिहाय उत्पन्न

तारकपूर : 9 लाख 97 हजार, शेवगाव : 10 लाख 47 हजार, जामखेड : 4 लाख 73 हजार, श्रीरामपूर : 6 लाख 77 हजार, कोपरगाव : 8 लाख 21 हजार, पारनेर: 10 लाख 31 हजार, संगमनेर: 5 लाख 66 हजार, श्रीगोंदा : 6 लाख 52 हजार, नेवासा : 9 लाख 85 हजार, पाथर्डी : 4 लाख 85 हजार, अकोले : 4 लाख 59 हजार रुपये

Back to top button