नगर : बीजपुत्र डाकेंनी दिल्या हजारो बिया | पुढारी

नगर : बीजपुत्र डाकेंनी दिल्या हजारो बिया

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : आपण पुस्तकातून वाचतो झाड किती महत्त्वाचे आहे. ते गेल्या काही वर्षांपासून आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. ऑक्सिजन आपल्या प्रत्येकाला लागतो; मग झाडंही प्रत्येकाने लावायला हवीत ना; शेती व्यवसाय सांभाळतही आपण पर्यावरणासाठी किती उत्तम काम करू शकतो. याचे उदाहरण नगर तालुक्यातील नगर-जामखेड रस्त्यावर असणारे सारोळा बध्दी गावातील तरुण अमोल भगवान डाके याने आपले दैनंदिन काम करताना आपला छंद जोपासला. त्यांनी हजारो बिया गोळा गेल्या आहेत. या बिया त्यांनी वन विभागाला दिल्या आहेत.

त्यांचा नगर येथे छोटासा व्यवसाय सांभाळून विविध झाडांच्या बिया 12 वर्षांपासून गोळा करत आहेत. विशेष म्हणजे या कामाचे फोटो न काढता अनेक झाडांच्या बिया जमा केल्या आहेत. वर्षभर जिथून मिळतील तिथून बिया गोळा करायच्या पावसाळ्यात परिसरात रस्त्याच्या दुतर्फा, डोंगर, माळरान, शेतीचे बांध आदी ठिकाणी जिथे झाड जोपासले जाईल, अशा ठिकाणी त्या रुजवायच्या. लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. या दोन वर्षांतच एक कोटींपेक्षा अधिक बिया गोळा करून त्या सरकारी शाळा वनविभाग वेगवेगळ्या खासगी संस्थाना झाड लावण्यासाठी वेगवेगळ्या झाडांचे बिया दिल्या आहेत.

अमोल म्हणाले, बहुतांश वृक्षांच्या बिया उन्हाळ्यात मिळतात. पावसाळ्याच्या आधी लावलेल्या बियांना अंकुर फुटून झाड उन्हाळ्यापर्यंत आठ महिन्यांत साधारण पाच फुटांपर्यंत वाढते. यामुळे उन्हाळ्यात पाण्याअभावी झाडे मारण्याची शक्यता कमी होते. बीजपुत्र अमोल डाके यांनी वन विभागाचे अमोल गोसावी, अशोक गाडेकर यांच्याकडे बिया सोपविल्या आहेत.

Back to top button