नगर : माजी पं. स. सदस्यावर अत्याचाराचा गुन्हा | पुढारी

नगर : माजी पं. स. सदस्यावर अत्याचाराचा गुन्हा

संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : महिन्यापूर्वी संगमनेर पंचायत समितीच्या एका माजी सदस्याच्या फसवणूकप्रकरणी ‘हनिट्रॅप’चा गुन्हा दाखल होवून अटक झालेल्या महिलेने आता पलटवार केला आहे. माजी सदस्यानेच, ‘तुला प्रमोशन देतो’, असे अमिश दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसात त्या माजी पं. स. सदस्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, संगमनेर तालुक्यात राहणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम करणार्‍या त्या महिलेने पं. स. सदस्य विष्णू राहटळ यास 40 लाख रुपये देण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत त्या महिलेविरोधात राहटळ याने फिर्याद दिली होती. त्यानुसार शिर्डी पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करीत तिला अटक केली होती.

यानंतर तब्बल महिन्याने त्या महिलेने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात येऊन राहटळ याने, ‘तुला आरोग्य खात्यात प्रमो शन करुन देतो’, असे खोटे अमिश दाखवून ओळख निर्माण केली. यानंतर त्याने ती महिला राहत असलेल्या घरी गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर बाभळेश्वर येथील एका हॉटेलच्या लॉजवर, सिन्नर बस स्टॅन्डलगत लॉजवर, सुकेवाडी येथील फार्म हाऊस तसेच संगमनेर शहरातील राहटळ याचे घरी बळजबरीने संबंध ठेवुन तिच्याकडून पैसे घेवुन वेळोवेळी शिवीगाळ करून दमदाटी करून अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, याबाबत त्या महिलेने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ याच्याविरुध्द लैंगिक अत्याचार, फसवणूक, धमकी, गर्भपात या कलमांव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तालुका पो. नि. पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो. नि. सुजित ठाकरे हे करीत आहे.

Back to top button