नगर : शिर्डीत द्वारकामाई मंदिर शेजारतीपर्यंत खुले राहणार | पुढारी

नगर : शिर्डीत द्वारकामाई मंदिर शेजारतीपर्यंत खुले राहणार

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त समितीच्यावतीने श्रींचे व्दारकामाई मंदिरात दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. दि. 14 जुलै 2022 पासुन श्रींची शेजारती होईपर्यंत श्रींचे व्दारकामाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

बानायत म्हणाल्या, श्रीक्षेत्र शिर्डी येथे देश-विदेशातुन लाखो भाविक श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता येतात. या ठिकाणी आल्यानंतर भाविक श्रींच्या समाधीसह व्दारकामाई, चावडी व गुरुस्थान आदी ठिकाणी प्राधान्याने दर्शनाकरीता जातात. त्यातच बाबांनी त्यांच्या हयातीत संपुर्ण जीवन हे व्दारकामाई येथे व्यथीत केले. या ठिकाणाहुन बाबांनी अनेक भाविकांना शिकवण, उपदेश, गोर-गरीबांची रुग्ण सेवा व अन्न दिले. बाबांनी असंख्य भाविकांना आपल्या लिला दाखवील्या. त्यामुळे व्दारकामाईस अनन्य साधारण महत्व आहे.

याअनुषंगाने संस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या सभेत श्रींची शेजारती होईपर्यंत व्दारकामाई मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवार दि. 14 पासुन पहाटे 5 ते रात्री 10.30 (शेजारती होईपर्यंत) श्रींचे व्दारकामाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याचे सांगत, भाविकांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बानायत यांनी केले.

Back to top button