नगर : गावठी कट्ट्यांसह एक जेरबंद | पुढारी

नगर : गावठी कट्ट्यांसह एक जेरबंद

नगर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोेलिसांनी नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल येथे सापळा लावून पाठलाग करून चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसासह एकाला शेंडी बाह्यवळण रस्त्यावर पकडले. महेश आदिनाथ काळे (वय 36, रा. जामगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने नगर – औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल येथे सापळा लावून महेश काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतूस, मोटारसायकल, मोबाईल असा 2 लाख 24 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

Back to top button