श्रीगोंद्यात औषध दुकान फोडले | पुढारी

श्रीगोंद्यात औषध दुकान फोडले

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा शहरातील दौंड-जामखेड रस्त्यावरील सरस्वती नदी पुलाजवळील भर चौकात असणारे सिद्धिविनायक मेडिकल स्टोअर चोरट्यांनी फोडले. रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दुकान मालकाच्या माहितीनुसार सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.

या मेडिकल सोबतच कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील साई सेवा पतसंस्था व एक स्पेअर पार्टचे दुकान फोडण्याचा देखील चोरट्यांनी प्रयत्न केला. पण त्यांचा तो प्रयत्न फसला. त्या ठिकाणाहून कुठलाही मुद्देमाल चोरट्याना चोरून नेता आला नाही, अशी माहिती पोलिसांकडून समजली. दरम्यान, या तिन्ही ठिकाणी श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले व गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने भेट दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत.

बेलवंडीनंतर श्रीगोंदा टार्गेट
बेलवंडी गावात दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला असून, जवळपास वीस दुकानांतील लूट करूनही ते दरोडेखोर अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. बेलवंडी चोरीचा तपास सुरू असतानाच, श्रीगोंद्यात दुकाने लुटल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे.

महत्त्वाचा धागादोरा हाती
श्रीगोंदा शहरात तीन दुकाने फोडण्यात चार आरोपींचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, लवकरच या चोरीचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे.

Back to top button