नगर : कोपरगावला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा | पुढारी

नगर : कोपरगावला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोपरगाव शहरातील नागरिकांना आश्वासित करून कोपरगाव शहराचा जटिल झालेला पाणी प्रश्न कायमचा सोडून दाखवतो, अशी ग्वाही दिली होती. त्यासाठी निवडून आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्याने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी 131.24 कोटी निधीस मंजुरी मिळविण्यात यश मिळविले. या निधीतून पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या कामाचा कार्यारंभ आदेश देखील प्रसिद्ध झाला आहे. हे काम लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली. मंगळवार (दि.5) रोजी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत ना. काळे बोलत होते.

ना. आशुतोष काळे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचा आमदार झाल्यानंतर पाच नंबर साठवण तलावाचे काम समृद्धी महामार्गाचे काम करीत असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीला करण्यास भाग पाडून प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण करून घेतले व पुढील कामासाठी आवश्यक असलेल्या 131 कोटी रुपयांच्या तांत्रिक खर्चाला मंजुरी देखील मिळवून जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती केल्याचे ना. काळे म्हणाले.

यावेळी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, सुनील शिलेदार, कृष्णा आढाव, रमेश गवळी, अ‍ॅड. विद्यासागर शिंदे, संदीप कपिले, दिनकर खरे, वाल्मिक लाहिरे, शैलेश साबळे, राजेंद्र वाघचौरे, अशोक आव्हाटे, राहुल देवळालीकर, गणेश बोरुडे, सचिन गवारे, इम्तियाज अत्तार, संदीप सावतडकर, अमीन शेख, फकीर कुरेशी, धनंजय कहार, शुभम लासुरे, निखिल डांगे, डॉ. तुषार गलांडे, भाऊसाहेब साठे, बाळासाहेब रुईकर, अंबादास वडांगळे, सचिन परदेशी, नारायण लांडगे, सुनील बोरा, प्रकाश दुशिंग, संतोष चव्हाणके, कार्तिक सरदार, जावेद शेख, एकनाथ गंगुले, किरण बागूल, शफिक शेख, राजेंद्र आभाळे आदी उपस्थित होते.

Back to top button