नगर : विवाहित महिलेचा छळ; चौघांवर पोलिसांत गुन्हा | पुढारी

नगर : विवाहित महिलेचा छळ; चौघांवर पोलिसांत गुन्हा

कोल्हार : पुढारी वृत्तसेवा : पुणे येथे सासूच्या नावावर असलेल्या घरामध्ये फर्निचर करण्यासाठी माहेरून पैसे आणावे, यासाठी विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केल्याची घटना नगर तालुक्यातील सावेडी येथे घडली.

शिल्पा विजय गडाख (वय 30, सावेडी ता. नगर, हल्ली दाढ ता. राहाता) यांनी लोणी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हणाले आहे की, सावेडी येथील पाईपलाईन रोडवरील श्रीराम चौकात रहात असलेल्या विजय गोविंद गडाख यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सासरी नांदत होते. परंतु, सासरच्या लोकांनी एक महिना चांगली वागणूक दिल्यानंतर यांनी मला घराला फर्निचर करण्यासाठी दोन लाख रुपये घेऊन ये, असे सांगितले.

माझा संसार सुखात चालवा म्हणून माझ्या घरच्यांनी दागिने गहाण ठेवून व कर्ज काढून सासरच्या मंडळींना पैसे दिले, तरीही वारंवार पैशांची मागणी होतच राहिली. मी विरोध केल्याने सासरी माझा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शिल्पा गडाख यांच्या फिर्यादीवरून पती विजय गोविंद गडाख, सासरे गोविंद नामदेव गडाख, सासू शशी गोविंद गडाख, दीर विवेक गोविंद गडाख यांच्याविरुद्ध लोणी पोलिसांत गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास लोणी पोलिस करीत आहेत.

Back to top button