नगर : 29 जुलैला अंतिम गटनिहाय मतदार यादी; 31 मे 2022 ची मतदार यादी ग्राह्य धरणार | पुढारी

नगर : 29 जुलैला अंतिम गटनिहाय मतदार यादी; 31 मे 2022 ची मतदार यादी ग्राह्य धरणार

नगर : पुढारी वृत्तसेवा: राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण कार्यक्रमापाठोपाठ मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. 29 जुलै 2022 रोजी गट-गणनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. दिवाळीपूर्वी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे.

आता ही पूर्वतयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. आयोगाने मंगळवारी (दि.5) गट व गणांच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमाला प्रारंभ होत नाही तोच, आयोगाने बुधवारी (दि.6) मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.

31 मे 2022 च्या मतदार यादीवरून जिल्हा परिषद गट व गणांची मतदार यादी तयार केली जाणार आहे. शक्यतो आरक्षण कार्यक्रमानंतरच मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. यंदा मात्र हे दोन्ही कार्यक्रम समांत्तर सुरू झाले आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदान केंद्रांची यादी व मतदानकेंद्रनिहाय अंतिम 8 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिध्द होणार आहे.

मतदार यादी कार्यक्रम
18 जुलै : प्रारुप मतदार यादी प्रसिध्द
22 जुलै : हरकती दाखल करण्याची शेवटची तारीख
29 जुलै : गट व गणनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द
8 ऑगस्ट : मतदान केंद्रनिहाय होणार प्रसिध्द

Back to top button