नगर : बसचालक- दुचाकीस्वार भिडले | पुढारी

नगर : बसचालक- दुचाकीस्वार भिडले

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने येणार्‍या एस.टी. बसचालकाने दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याने दुचाकीस्वारास एसटी बसचालकाने जबर मारहाण केली. दरम्यान, दुसर्‍या घटनेमध्ये एसटी बसला दुचाकी आडवी लावून बसचालकाने जाब विचारला असता दुचाकीस्वाराने एस. टी. बसचालकास मारहाण करून जखमी केले. सरकारी कामात अडथळा आणत जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सकाळी ढगाडीबाबा येथे घडली.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी सांगितले की, पुणे- शिवाजीनगर आगाराची एस.टी. बस (क्र. एम. एच. 14 बी. टी. 5056 ) चे चालक राजू उत्तम सरोदे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन संगमनेरकडे येत असताना बाळू रोहिदास पवार (रा. लोणी, हसनाबाद) याने दुचाकी (क्र.एम. एच. 12 के. एफ. 5259) एस. टी. बसला ओव्हरटेक करून बससमोर पवार याने दुचाकी आडवी लावली. बस अडवून तो बस चालक सरोदे यांना म्हणाला, तुम्ही दुचाकीला बसचा कट का मारला, असे विचारत शिवीगाळ करून, त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणला याबाबत बसचालक राजू सरोदे यांनी संगमनेर तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीचालक बाळू पवार याच्या विरोधात सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.

दुसर्‍या घटनेत नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी शिवारात ढगाडीबाबा परिसरात दुचाकीला कट का मारला, असे बस चालकास विचारले असता त्याचा राग येऊन बाळू पवार यास शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दगड फेकून जखमी केल्याची फिर्याद रोहिदास पवार यांनी शहर पोलिसात दिली. या फिर्यादीवरून राजू उत्तम सरोदे (रा. शिवाजीनगर, एस. टी. डेपो पुणे) यांच्याविरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास पो. नि. पांडुरंग पवार व स. पो. नि. इस्माईल शेख व सतीश पाटोळे हे करीत आहेत.

Back to top button