नगर : शिर्डीत सहाशे किलो गोमांस पकडले | पुढारी

नगर : शिर्डीत सहाशे किलो गोमांस पकडले

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : गो-हत्या करून ते विक्रीला जात असलेले चारचाकी वाहन पोलिसांनी निमगाव-निघोज हद्दीत पकडले. वाहनांमधून सुमारे 600 किलो असलेली आलिशान चारचाकी वाहन पकडले असून या मासाची अंदाजे किंमत दोन लाख आहे. पोलिसांनी गोमांसह चारचाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी एकावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.

शिर्डी पोलिस ठाण्याचे अजय अंधारे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, सोमवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी पोलिस नाईक दिनकर, एकलव्य माळी व नितीन शेलार यांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की, श्रीरामपूर वरून एक इनोव्हा (कार क्र. एम. एच. 04 डी. जे. 8129) गोमांस घेऊन निर्मळ पिंपरी बाय पासने जाणार आहे. या वाहनांमध्ये गो मांस असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्या वाहनाची तपासणी करून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश दिले.

सापळा रचून पकडले

पो. नि. पाटील यांच्या आदेशानुसार आमच्या पथकाने निघोज बायपासजवळ सापळा रचला. पाटील यांनी सांगितलेल्या वर्णनाची गाडी आम्हाला दिसली. पोलिसांनी ती थांबविण्यासाठी चालकाला हात दाखवला. मात्र, त्या चालकाने कोपरगावच्या दिशेने सुसाट वाहन पळवले. त्यानंतर पोलिसांनी त्या वाहनांचा पाठलाग केला. नगर-मनमाड रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ ही गाडी पकडली. त्या गाडीचा वाहनचालक जुनेद बाबा शेख (वय 30 वर्षे. रा. मिल्लतनगर, श्रीरामपूर) याला पोलिसांनी पकडले. वाहनचालकास पोलिसांनी विचारले असता हे मांस मुंबईला विक्रीसाठी चालवले होते. हे सुमारे 600 किलो असून त्याचा अंदाजे भाव 200 रुपये प्रमाणे त्या मासाची किंमत दोन लाख रुपये आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

हे मांस शाहरूख कल्लू कुरेशी व मोसीन ऊर्फ बुंदी कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, वॉर्ड क्र. 2, श्रीरामपूर) यांनी त्या वाहनात टाकला होता. मुंबईतील कुर्ला येथील जावेद होस याने हा विकत घेतला होता, अशी माहिती वाहनचालक याने फिर्यादिस दिली. राहाता येथील पशू अधिकारी यांनी त्या मांसाचे नमुने घेतले आहेत. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

संगमनेर येथील अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाई केल्यानंतर श्रीरामपूर येथून मोठ्या प्रमाणात मुंबई, औरंगाबाद, नेवासा येथे मोठ्या प्रमाणावर गोमांस जात आहे. गोमांस वाहतूक करण्यासाठी आलिशान गाड्यांचा वापर होत आहे. पहाटेच्यावेळी ही वाहने आपल्या मार्गाने मार्गस्थ होतात. याबाबत पोलिसांनाही माहिती असूनही याकडे ते कानाडोळा करीत आहे.

Back to top button