नगर : रामपूर परिसरात महिलेचा तिघांकडून विनयभंग | पुढारी

नगर : रामपूर परिसरात महिलेचा तिघांकडून विनयभंग

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : घरात एकटी असलेल्या महिलेच्या घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करण्यात आले. राहुरी तालुक्यातील रामपूर परिसरात दि. 3 जुलै रोजी ही घटना घडली.

या घटनेतील 35 वर्षीय महिला ही दि. 3 जुलै रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान तिच्या घरात एकटीच होती. तेव्हा दीपक पठारे हा आरोपी तिच्या घरात घुसला. तेव्हा तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या इतर आरोपींनी त्या महिलेच्या पतीला लाकडी काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या प्रकारानंतर त्या महिलेने पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्या महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन बाबासाहेब पठारे, निर्मला दीपक पठारे, दीपक बाबासाहेब पठारे (सर्व रा. लक्ष्मीवाडी, रामपूर, ता. राहुरी) या तिघांजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक देविदास कोकाटे हे करीत आहेत.

Back to top button